मुख्य बातम्या

‘केसीआर यांनी जाहिर केली बीआरएसची राज्य स्तरीय संचालन समिती’…

‘केसीआर यांनी जाहिर केली बीआरएसची राज्य स्तरीय संचालन समिती’…
___राज्यातील वाढत आसलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या, विमा योजना,कर्जमाफी ,शेतकऱ्यांना दुबार पेरणी करीता मिळणारी मदत , आणि पूरग्रस्तांना मदत या सर्व स्तरावर हे सरकार अपयशी ठरले आहे ,औरंगाबादचे मराठवाडा विभागीय कृषी आयुक्त केंद्रेकर यांनी जाहीरपणे मागणी केली होती की ,तेलंगाना सरकारने ज्याप्रमाणे दुबारपेरणी , बी बियाणे करीता शेतकऱ्यांना प्रति एकर १००००/रुपये इतकी मदत करते त्याचप्रमाणे आपल्या राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांना प्रति एकर १००००/ रुपये मदत जाहीर केली पाहिजे, त्यामुळे होणाऱ्या शेतकरी आत्महत्या थांबतील त्यांची ही मागणी सरकारने मान्य तर केलीच नाही परंतु त्या आयुक्तास नोकरी सोडण्यास भाग पाडले. राज्यात तेलंगणा पॅटर्न राबवल्यास शेतकरी सुखी होईल आणि राज्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबतील असा दावा माजी खासदार आणि बिआरएस पक्षाचे वरिष्ठ नेते हरिभाऊ राठोड यांनी केला आहे .

बिआरएस पक्ष्याचे सुप्रिमो केसीआर यांनी राज्यात संचालन समिती जाहीर केली असून ती खालील प्रमाणे आहे.
मा.श्री. कल्वाकुंतला वामशीधरराव राज्य समितीचे प्रभारी असतील तर खालील प्रमाणे या उच्चस्तरीय राज्यस्तरिय समितीचे सदस्य असतील
१. मा. खा. श्री.हरिभाऊ राठोड
(ओबीसी नेते )
महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य
२. मा.आ.श्री शंकरअण्णा धोंडगे  (शेतकरी नेते) महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य
३. माणिकराव कदम (बहुजन व शेतकरी नेते ) महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य व अध्यक्ष ,भारत राष्ट्र समिती किसान सेल.
४ मा.श्री.दीपक राव आत्राम (आदिवासी नेते) महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य.
५. मा. श्री प्राध्यापक डॉ. यशपाल भिंगे( धनगर ओबीसी वंचित नेते) महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य
६ मा.श्री सचिन साठे (वंचित व दलित नेते )महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य.
७. मा. जनाब मौलाना अब्दुल कदिर (दलित व मुस्लिम नेते,) महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य
८. मा. फिरोज पटेल (मुस्लिम अल्पसंख्यांक नेते)महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य.

९.मा.आ.श्री भानुदास मुरकुटे (बहुजन नेते) महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य.

१०.मा.आ.श्री घनश्याम शेलार (बहुजन नेते) महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य.
११ .मा. श्री ज्ञानेश वाकुडकर( बहुजन नेते) महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य.
१२ . मा. आ. श्री अण्णासाहेब माने पाटील (बहुजन नेते) महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य.
१३. मा.सौ.सुरेखाताई पुणेकर (लोककलावंत तथा महिला नेत्या,)
महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य.

राज्य सरकारचे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्या कारणाने विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी सुचवलेले तेलंगणा पॅटर्ननुसार शेतकऱ्यांना मदत मिळावी ही मागणी विधायक असून , राज्यात देखील तेलंगणा पॅटर्न राबविला पाहिजे , अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. के.सी.आर यांनी जाहीर केलेली संचालन समिती ही सक्षम असून बीआरएस पक्षाचे ध्येय धोरण महाराष्ट्रातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी कटीबद्ध आहे. येणाऱ्या काळात

“अब की बार किसान सरकार” चा नारा अधिक बुलंद करण्याचा विश्वास हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केला .

Most Popular

To Top