By
Posted on
मुंबई :-
गेली 3 वर्ष पासून आम्ही सर्वच विरोधक विधान परिषदेतही आणि सभागृहाच्या बाहेरही
कर्ज माफीची मागणी करतोय. आता तर मागच्या, 60 वर्षाच्या इतिहासात
स्वतः जगाचा पोशिंदा शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतआहेत.
नेमके या सरकारला आणखी किती बळी हवे आहेत, हे आमच्या सुद्धा लक्षात येईना.
3 वर्ष झाली शेती मालाला भाव नाही,शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर वाढत चाललाय
तरी मुख्यमंत्र्यांच्या काळजाला पाझर का फुटत नाही.
सरकार अभ्यासाच्या नावाखाली सभागृहातही आणि सभागृहाच्या बाहेरही निव्वळ वेळ कडूपणा करत आहे .
