BRS Kolhapur| ९ ऑगस्ट क्रांतीदिनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा इस्लामपूर येथे भव्य सन्मान सोहळा तैयारी
“तेलंगणाचे राज्याचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे पक्षाचे अध्यक्ष मा. के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राज्यात शेतकरी हिताच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. त्यांच्या या कामगिरीचा गौरव म्हणून क्रांतिदिनी,९ ऑगस्ट २०२३ रोजी के. चंद्रशेखर राव यांचा सन्मान सोहळा इस्लामपूर येथे आयोजित केला आहे. अशी माहिती शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिली.
१० हजार शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी १ वाजता हा सन्मान सोहळा होणार असून. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेचे हजारो कार्यकर्ते बीआरएस पक्षांमध्ये मध्ये सहभागी होणार आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेत बोलताना शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिली. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर टीकास्त्र सोडले. तसेच शिंदे-फडणवीस-पवार सरकारवरही टीका केली.
शेतकरी संघटना ही अराजकीय संघटना आहे. शेतकरी संघटनेचे अस्तित्व कायम ठेवून आम्ही सगळे बीआरएसमध्ये काम करणार आहोत. माझ्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी शेतकऱ्यांच्या समस्या, शेतकरी संघटनेच्या मागण्या यासंबंधी सविस्तर चर्चा केली आहे. राव यांचे सरकार हे शेतकरी हिताचे धोरण राबवित आहे. म्हणून त्यांचे हात बळकट करण्याचा निर्धार आम्ही केला आहे.” असे रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले.