महाराष्ट्र

युती न करता स्वबळावर लढण्याची राज ठाकरेंची घोषणा

युती न करता स्वबळावर लढण्याची राज ठाकरें

महापालिका निवडणुकांसाठी मनसेने कंबर कसली आहे. आता थेट ‘वॉर रुम’मधून मनसे प्रमुख राज ठाकरें जनतेशी संवाद साधला.

मनसेच्या मुंबई विभागाच्या ‘वॉर रूमचे’ राज ठाकरेंच्या हस्ते उदघाट्न झाले.
यावेळी फेसबुकच्या माध्यमातून राज ठाकरे जनतेशी LIVE संवाद साधला.

यावेळी राज ठाकरेंनी प्रसारमाध्यमांवर टीकेची झोड उडवत, माध्यम विकली गेली असल्याचा घणाघाती आरोप केला. तसेच
राज ठाकरे LIVE थेट वॉर रुममधून
– सध्या कोणताही पर्याय समोर दिसत नसल्याने स्वबळावरच लढणार असल्याची राज ठाकरेंची घोषणा

– निवडणुकांच्या तोंडावर जातीय विष पसरवले जात आहे.

– संबध तूटले तरी चालतील पण भूमिका बदलणार नाही

– सत्ता उपभोगली मग सेनेच्या भ्रष्टाचारात भाजप सहभागी नाही का?

– भाजपने 30 वर्ष शिवसेनेसह सत्ता उपभोगली

– मला सतत टीव टीव करायला आवडत नाही

– निश्चितच पून्हा एकदा नाशिकमध्ये मनसेची सत्ता आणून दाखवेन

– मनसेने केलेल्या कामाचे कुणाही कौतुक करत नाही

– जेवढे टोल नाके बंद झाले ते फक्त मनसेमुळे बंद झाले

– आमच्या मिरवणुका तुम्ही लगेच बंद करता, मग मुस्लीमांच्या मिरवणुकांना रात्री उशीरा पर्यंत परवानगी कशी मिळते?

– मी हिंदू आहे त्यात गैर काय?

– मी मराठी आहे, हिंदू आहे हे कोणी नाकारणार आहे का?

– नाशिक महापालिकेचं कर्ज फेडून काम केली

– नाशिक इतकी काम दुस-या शहरात झालेली नाहीत

– वर्तमानपत्रे, चॅनल्स विकल्या गेल्यासारखे बातम्या देत आहेत

– ना मी कुणाकडे गेलोय, ना कुणी माझ्याकडे आलेय – युती बाबात राज ठाकरेंची फटकेबाजी

– जे मनसे सोडून जात आहेत त्यांना जाऊदे

– माझ्याकडे उत्तम काम करणारी माणस आहेत.

– माझी अवस्था भाजप पक्षासारखी नाही

– मी टीझर, ट्रेलर टाकत नाही पिक्चर दाखवतो

– शिवसेनेचे काय चालले आहे त्यांच त्यांनाच ठाऊक

– नोटाबंदीनंतर भाजपाकडे नोटा कशा आणि कुठून आल्या.

– काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची माणस भाजपाच्या चिन्हावर निवडून येतायत

युती न करता स्वबळावर लढण्याची राज ठाकरेंची घोषणा

 

युती न करता स्वबळावर लढण्याची राज ठाकरेंची घोषणा
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top