पुणे : राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. 10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे आता मतदार यादीत नाव आहे की नाही, हे पाहण्यासाठी मतदारांची धावपळ सुरु होईल. मात्र, आता मतदार यादीतील नाव ऑनलाईन तपासता येणार आहे.

ऐनवेळी मतदार यादीत नाव नसल्याने मतदान करता येणार नाही. त्यामुळे मतदानाचा अधिकार असूनही मतदान करता न आल्याचा मनस्ताप टाळण्यासाठी आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही हे आताच पाहा.

मतदाराचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहाण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर एक स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. वेबसाईटवर आपण आपले नाव, मतदान केंद्राची माहिती मिळवू शकतो. आपले नाव पाहाण्यासाठी या लिंकवर क्लिक करा-

http://103.23.150.139/marathi/ याशिवाय https://ceo.maharashtra.gov.in/

या साईटवरही आपलं नाव पाहाता येईल.

असं पाहा आपलं नाव :

इलेक्शन कमिशनच्या साईटवर गेल्यानंतर आपल्यासमोर ‘Name Wise’ आणि ‘ID Card Wise’ हे दोन पर्याय उपलब्ध असतील.त्यातील ‘Name Wise’ पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढे ‘District’ आणि ‘Assembly’ असे दोन पर्याय समोर येतील.त्यापैकी ‘Assembly’ हा पर्याय निवडल्यास तुम्हाला पुढे चार पर्याय पुढे येतील. ते सर्व पर्याय तुम्हाला भरावे लागतील.त्यामध्ये पहिला पर्याय असेल तो ‘Select District’. त्या पर्यायात तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.त्या पुढचा पर्याय ‘Select Assembly’. म्हणजेच तुमचा मतदारसंघ. त्या पर्यायापुढे तुमच्या मतदारसंघांचे नाव निवडा.त्यानंतर तुमचे नाव टाका. (तुमचं नाव, आडनाव, वडिलांचं किंवा पतीचं नाव इंग्रजीमध्ये टाईप करणं बंधनकारक आहे.)त्यानंतर तुमचे आडनाव टाका.त्यानंतर तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव टाका.हे सर्व रखाने भरल्यानंतर ‘Search’ या पर्यायवर क्लिक करा.
ही प्रक्रिया पूर्ण करताच तुमचे नाव, तुमचा मतदार क्रमांक, वय याबाबतची माहिती समोर येईल. याशिवाय तुम्हाला तुमचं मतदान केंद्र पाहायचे असल्यास त्या पर्यायातील Polling Station Address यावर क्लिक करा. त्यांनंतर तुम्हाला तुमच्या मतदार केंद्रांची माहिती उपलब्ध होईल. याशिवाय तुमच्या कुटुंबातील व्यक्तीचे नावही पाहाता येणार आहे.

ही संपूर्ण प्रक्रिया पार केल्यानंतरही नाव न आल्यास, नावाची स्पेलिंग पुन्हा एकदा चेक करा. लक्षात ठेवा की, सर्च करताना तुमचं नाव आणि उर्वरित तपशील इंग्रजीत भरावयाचा आहे.

मतदार यादीत तुमच नाव इथे चेक करा
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top