कोणत्याही कामाचे यश तुम्ही त्या कामासाठी कसे प्रयत्न केले आहेत त्यावर अवलंबून असते. आयुष्यात प्रत्येक पावलावर यश हवे असल्यास आचार्य चाणक्यांची ही नीती लक्षात ठेवा.
प्रभूतं कायमपि वा तन्नर: कर्तुमिच्छति।
सर्वारम्भेण तत्कार्यं सिंहादेकं प्रचक्षते।।
एखाद्या व्यक्तीला लक्ष्य गाठण्याची इच्छा असेल तर त्याने पूर्ण ताकद लावून काम करावे. ठीक त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे एखादा वाघ शिकार करतो.
नीतीशी संबंधित काही खास गोष्टी…
आचार्य चाणक्य सांगतात की, आपण जे काही काम करत आहोत ते पूर्ण ताकदीने करावे. काम छोटे असो किंवा मोठे आपण पूर्ण ताकद लावून ते केले तरच यश निश्चित होते.
ज्याप्रकारे वाघ आपल्या शिकारीवर पूर्ण शक्तीने तुटून पडतो आणि शिकारीला पळून जाण्याची संधी देत नाही. याच गुणामुळे तो कधीही अयशस्वी होत नाही. आपण वाघाप्रमाणेच आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी पुढे चालत राहावे. कामामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये. हाच यशाचा अचूक उपाय आहे.