पुलाची केली पाहणी , 24 तासात पर्यायी पुलाचे काम होणार सुरु
बीड दि. 6—- विधान परिषद विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे
यांच्या प्रयत्नांमुळे बीडच्या पुलाचा प्रश्न लागणार मार्गी लागणार आहे.आज त्यांनी या पुलाची पाहणी करून 24 तासात पर्यायी पुलाचे काम होणार सुरु होईल या दृष्टीने नियोजन केले.
बीडच्या बार्शी नाक्यावरील पुल
हा धोकादायक स्थितीमध्ये असल्या कारणाने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. गेल्या महिनाभरापासून नॅशनल हायवेची कनेक्टिव्हिटी बंद पडलेली आहे. ग्रामीण भागातील लोकांचे अतोनात हाल सुरू आहेत. मागच्या दोन वर्षांपूर्वी पुलाची डागडुजी केली होती त्याचवेळी त्या पुलाचे आयुष्य लक्षात आले होते. खरं तर नवीन पुलाच्या प्रस्ताव त्याचवेळी पाठवणे गरजेचं होतं तसं काम या प्रशासनाने केल नाही.
पर्यायी पूल जोरदार पावसाच्या पाण्याने वाहून गेला. प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
पुलाची स्थिती व नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आज ना. मुंडे यांनी आज बीड शहरातील बिंदुसरा नदीवरील धोकादायक पुलाची पाहणी केली.
वाहून गेलेल्या पर्यायी पुलाची तातडीने उभारणी करून बीडच्या नागरीकांची गैरसोय दूर करावी यासाठी त्यांनी IRB आणि NHAI च्या अधिका-यांची
बैठक घेतली तसेच जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांचीही भेट घेतली. हा पर्यायी पूल तात्काळ सुरु करावा याच्या सुचना करतांनाच त्यासाठी लागणारे पाईप उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. या पर्यायी पुलाचे काम 24 तासात सुरु करण्याच्या सूचना दिल्याने बीड करांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.
यावेळी युवक नेते तथा जिल्हा परिषद सदस्य संदीप भैय्या क्षिरसागर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, माजी आमदार राजेंद्र जगताप, सय्यद सलीम , उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, अविनाश नाईकवाडे व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ना. मुंडे यांनी हजारो नागरिकांशी संवाद साधला.
नियोजित मिनी बायपास ला सर्विस रोड, अँप्रोच रोड करण्याच्या सूचनाही त्यांनी देऊन तसा प्रस्ताव पाठवण्याचे सूचित केले. या बाबत त्यांनी तातडीने irb आणि nhai च्या वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा केली.
बीडचे विद्यमान लोकप्रतिनिधी , पालकमंत्री यांच्या निष्क्रियतेमुळेच पुलाचा प्रश्न सुटू शकला नसल्याचा आरोप त्यांनी केला. महाड येथील सावित्री पुलावरील पुलाच्या धर्तीवर बीड चा पूलही 180 दिवसात पूर्ण व्हावा यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगतीले.
मिनी बायपास नवरात्रीच्या आधी सुरू करा जेणे करून बीड शहराचे आराध्य दैवत खंडेश्वरी देवीला येणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी सूचना हि त्यांनी केली.
■■■■■■■■■■