महासत्ता :- मुंबईच्या भेंडीबाजार भागातील पाकमोडिया स्ट्रीटवर हुसैनीवाला बिल्डिंग कोसळण्याची दुर्घटना दूदैवी असून या घटनेस म्हाडाच जबाबदार आहे.
म्हाडाने SBUT ला पुनर्विकासाची जबाबदारी दिली असली तरी काम होते का नाही हे पाहण्याची अंतिम जबाबदारी म्हाडाचीच होती. त्यामुळे म्हाडा स्वतःची जबाबदारी झटकू शकत नाही.
मुंबईतीलधोकादायक इमारतीचा 25-25 वर्ष पुनर्विकास विकास होत नसल्याने भाडेकरू जागा सोडत नाही. निश्चित काळात पुनर्विकास करण्याचे धोरण ठरले पाहिजे.
भाडेकरूंना इमारत परिसरातील भागातच संक्रमण शिबीरात घरे उपलब्ध करून दिली पाहिजेत.
शासनाने स्वतःच्या ड्रीम प्रोजेक्ट पेक्षा धोकादायक इमारतीच्या पुनर्विकासाकडे आणि नागरिकांच्या जीवाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे
घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रु तर जखमींना 2 लाखाची मदत द्यावी.
सोबत आमदार किरण पावसकर, आमदार राहुल नार्वेकर, स्थानिक आमदार अमीन पटेल उपस्थित होते.
