मुख्य बातम्या

जलयुक्त शिवार व कृषी विभागात परळी अंबेजोगाई मध्ये 18 कोटींचा भ्रष्टाचार उघड

जलयुक्त शिवार व कृषी विभागात परळी अंबेजोगाई मध्ये 18 कोटींचा भ्रष्टाचार उघड

परळी वैजिनाथ :- बीड जिल्यातील परळी व अंबेजोगाई तालुक्यामधे जलयुक्त शिवार योजने अंतर्गत २०१६-२०१७ मध्ये १८ कोटी पेक्षा जास्त रक्कम अपहार झाल्याचा आरोप ओबीसी काँग्रेस सेलचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतजी मुंडे यांनी केला आहे .

वसंत मुंडे यांनी परळी व अंबेजोगाई तालुक्यातील बोगस कामाची तक्रार राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे दाखल केली आहे. या तक्रारी वरून महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास व जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई यांनी दि . ०६ जुलै २०१७ संदर्भ -२०१७/सं.क्र/१६८४/जल -७ अन्वेय महाराष्ट्र शासनाचे अव्वर सचिव नारायण कराड यांनी परळी व  अंबेजोगाई तालुक्यातील जलयुक्त शिवार व कृषीखात्याच्या कामाची तात्काळ चौकशी करून कार्रवाहीचे आदेश शासनामार्फत आयुक्त कृषी सुनिल केंद्रेकर महाराष्ट्र राज्य पुणे व संचालक , मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन पुणे , तसेच जिल्हाधिकारी बीड याना विशेष दक्षता पथक पुणे मार्फत विविध कृषी खात्याच्या योजना संदर्भात गुत्तेदार व कृषिअधिकारी याना दिले आहेत. जलयुक्त शिवाराची शासकीय अधिकाऱ्यांशी संगनमत करून जुनी कामे नवीन दाखवून बोगस रेकॉर्ड करून १८ कोटीचा  भ्रष्टाचार केला आहे .

जलयुक्त शिवार व कृषी विभागात परळी अंबेजोगाई मध्ये 18 कोटींचा भ्रष्टाचार उघड
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top