हरियाणामधल्या सिरसा येथील गुरमीत बाबा राम रहिमच्या डेरा सच्चा सौदाची लष्कर आणि हरियाणा पोलिसांकडून तिस-या दिवशीही झाडाझडती सुरु झाली आहे.
सिरसा : हरियाणामधल्या सिरसा येथील गुरमीत बाबा राम रहिमच्या डेरा सच्चा सौदाची लष्कर आणि हरियाणा पोलिसांकडून तिस-या दिवशीही झाडाझडती सुरु झाली आहे.
दुस-या दिवशी सर्च ऑपरेशनमध्ये डेरामधील एक अवैध फटाक्याचा कारखाना सील केलाय. तसंच या पथकाला डेरा सच्चा सौदाच्या महिला शिष्यांच्या हॉस्टेलकडे जाणारा एक गुप्त रस्ताही आढळून आला आहे.
एके ४७ रायफलीच्या कार्टीजचा रिकामा बॉक्स, फटाक्यांचे ८४ खोके, तसंच अवैध कारखान्यासाठीचं रसायन, असा मुद्देमाल, शनिवारच्या झडतीत हस्तगत करण्यात आला. याखेरीज दीड हजार बूट, तीन हजार डिझायनर कपडे आणि टोप्या, पलंगही सापडलेत. आता तिस-या दिवशी शोधपथकाला काय काय हाती लागणार याकडं नजरा लागल्या आहेत.