देश -विदेश

महाराष्ट्रातील २५ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार …

महाराष्ट्रातील २५ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार ...

महाराष्ट्रातील २५ शिक्षकांना उल्लेखनीय योगदानासाठी उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले . दिल्ली येथील विज्ञान भवनात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्यावतीने ‘शिक्षक दिना’ निमित्त राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार वितरणाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह आणि डॉ. सत्यपाल सिंह, सचिव अनिल स्वरूप यावेळी उपस्थित होते.

उल्लेखनीय योगदानासाठी यावर्षी देशभरातील एकूण 319 शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-2016-17’ प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील एकूण 25 शिक्षकांना यावेळी गौरविण्यात आले. यात 17 प्राथमिक शिक्षकांपैकी 2 शिक्षकांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. 8 माध्यमिक शिक्षकांपैकी एका शिक्षकास विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. पदक, प्रमाणपत्र आणि 50 हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

17 प्राथमिक शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

नागोराव तायडे, महानगर पालिका उच्च प्राथमिक मराठी शाळा क्र.2, घाटकोपर(प.) (मुंबई), उज्ज्वला नांदखिले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, साडेसतरा नळी, ता.हवेली (पुणे), शोभा माने, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचणी, ता. तासगांव(सांगली), तृप्ती हतिसकर, महानगर पालिका प्राथमिक शाळा, प्रभादेवी (मुंबई), सुरेश शिंगणे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पिंपळगांव चिलमखा, पो. उंबरखेड, ता. देऊळगांव राजा(बुलडाणा), संजिव बागुल,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सांभवे, पो. माळे ता.मुळशी (पुणे), राजेशकुमार फाटे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डोंगरगांव, पंचायत समिती लाखनी (भंडारा), ज्योती बेलावळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केवनीदिवे, पो. काल्हेर, ता. भिवंडी (ठाणे), अर्जुन ताकटे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,अहेरगांव, ता. निफाड(नाशिक), रुख्मिणी कोळेकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वांगी-2, ता. करमाळा (सोलापूर), रामकिशन सुरवसे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नागोबावाडी, ता.औसा (लातूर), प्रदीप शिंदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिलापूर, ता.जि.(नाशिक),अमीन चव्हाण, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, निंभा, पो. देऊरवाडा, ता. दिग्रस (यवतमाळ), उर्मिला भोसले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महालदारपुरी, ता.वाशी (उस्मानाबाद), गोपाल सुर्यवंशी ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गंजुरवाडी, ता.जि.(लातूर) या शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्रातील २५ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार …
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top