By
Posted on
18 नोव्हेंबर : नागपूरच्या विदर्भ इन्फोटेक नावाच्या कंपनीवर गंभीर आरोप सुरू झालेत. काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्यानंतर आता धनंजय मुंडेंनीही आरोप केलेत. विदर्भ इन्फोटेकला 3 वर्षात 8 ते 10 विभागातली 100 कोटींची कामं मिळणं संशयास्पद आहे, याची चौकशी करा, असं ट्विट धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केलंय. मुख्यमंत्र्यांना मुंडेंनी ट्विटमध्ये टॅगही केलंय.
नो पार्किंगमधल्या गाड्या उचलून नेण्याची कंत्राटं मिळवणं आणि नागपूरच्या शासकीय कार्यालयांमध्ये संगणकांची देखभाल करणं, ही विदर्भ इन्फोटेक कंपनीची प्रमुख कामं आहेत.
धनंजय मुडेंनी काय ट्विट केलंय.
– विदर्भ इन्फोटेकला गेल्या 3 वर्षांत 8 ते 10 विभागातील शेकडो कोटींची कामं मिळणं संशयास्पद आहे. देवेंद्र फडणवीस, याची चौकशी झाली पाहिजे. #मुंबईटोईंग
