By
Posted on
“प्रभू वैद्यनाथा माझे पाय जमिनीवरच आहेत, ते कायम जमिनीवरच राहावेत!”
अन ‘त्या’ असामान्य नेतृत्वाने सर्वसामान्यांच्या पंक्तीत बसून प्रसाद घेतला …..
बीड :- यशाची जोड कधीही अहंकाराशी लागू नये म्हणतात, त्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण काल 118 व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता प्रसंगि अहमदपुर तालुक्यातील मोळवन या गावी दिसून आले. व्हीआयपी कल्चर ला झुगारून सर्वसामान्यांत सहज मिसळणारे नेतृत्व सर्वांना आपलेसे वाटते विधानपरिषद विरोधीपक्षनेते ना. धनंजय मुंडेंनी लोकांमध्ये बसून काल सप्ताहाच्या प्रसादाचे सेवन केले. “प्रभू वैद्यनाथा माझे पाय जमिनीवरच आहेत, ते कायम जमिनीवरच राहावेत!” असं म्हणणाऱ्या ना धनंजय मुंडेंनी काल त्याचा प्रत्ययच उपस्थितांना करून दिला.
