By
Posted on
Mahasatta.com, खेड
पाच मंत्री पदासाठी शिवसेना भाजप पुढे लाचार झालेत. मागे मागे फिरत आहेत असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी केला आहे.
खेड तालुक्यातील पाईट गावात राष्ट्रवादी काँग्रेसचा शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
भाजपच्या मंत्र्यांचा भष्टाचाराचा पाढाही त्यांनी वाचून दाखवला. माझी बहिण, विनोद तावडे, आदिवासी मंत्री, महसुलमंत्र्यांचा भष्टाचार केला तो पुराव्यानिशी सादर केले पण मुख्यमंत्र्यांनी सर्वांनी क्लिनचिट दिली असे मुंडे म्हणाले.
चार वर्षांच्या दुष्काळातुन शेतकरी कसाबसा सावरला असताना नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा दुष्काळ आणला. शेतक-यांच्या मालाला बाजारभाव मिळत नाही.
काळा पैसा आता जमा झाला असेल तर आता शेतक-यांची १५ हजार कोटींची कर्ज माफी करा अशी मागणीही त्यांनी केली.