By
Posted on
नवी दिल्ली – शिओमी रेडमी नोटच्या पहिल्या सेलला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर फ्लिपकार्टवर आज पुन्हा रेडमी नोट ४ ची विक्री करण्यात आली. हा फोन थोड्याच वेळात आऊट ऑफ स्टॉक झाला. २,५०,००० लाख फोनची २३ जानेवारी रोजी अवघ्या काही मिनिटांतच विक्री झाली होती. तितक्याच फोनची विक्री या ही वेळी झाली असावी असा अंदाज आहे. जर आपला इमेल अॅड्रेस फ्लिपकार्टवर दिला तर जेव्हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
या फोनचे सप्टेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर लाँचिंग झाल्यापासून हा फोन भारतीय बाजारपेठेत कधी दाखल होतो याबद्दल उत्सुकता होती. रेडमी नोट ४ ला या क्षेत्रातील समीक्षकांनी पसंती दिली आहे. अनेक दिवसानंतर अत्यंत भरवशाचा आणि अद्ययावत फोन बाजारात आल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.