अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शेरो-शायरींचा अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पात शेतकरी आणि तरुणांसाठी काहीच नाही, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. आम्हाला मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती. मात्र सरकारचा अर्थसंकल्प अतिशय किरकोळ आणि साधा फटाका निघाला, अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावर भाष्य केले. राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीविषयी सरकारकडून उचलण्यात येणाऱ्या पावलांना समर्थन असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
Union Budget 2017: सरकारचा अर्थसंकल्प शेरो-शायरींचा; शेतकरी आणि तरुणांसाठी काहीच नाही- राहुल गांधी