dhananjay munde
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्या -ना.धनंजय मुंडेंची विधान परिषदेत

मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे कामकाज रोखुन धरले.

नागपूर, दि. 14………………… मराठा समाजाचा सरकारवरचा विश्वास आता उडाला आहे, आता चर्चा नको तर आरक्षणाचा निर्णय हवा आहे. त्यामुळे चर्चा पुरे करा आणि आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्या अशी मागणी आज विधान परिषदेत पुन्हा विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी लावून धरली.

नागपूर येथे आज मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत कामकाज सुरु होताच ना.मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमाद्वारे हा मुद्दा उपस्थित केला. आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी राज्यातील बहुसंख्य असलेला समाज मुक मोर्चाच्या माध्यमातुन आंदोलन करत आहे. आजही लाखो समाज बांधव नागपूरच्या रस्त्यावर उतरला आहे. तरीही सरकार याची दखल का घेत नाही ? असा सवाल करत या विषयावर झालेल्या चर्चेत समाजाला रस नाही. चर्चेच्या माध्यमातून समाजाचे कोणतेही समाधान झाले नाही, सरकार कडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यामुळे समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सरकारवरचा समाजाचा विश्वास उडाला आहे. सरकारच्या प्रमुखांना समाजातील युवकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे, त्यामुळे आता चर्चा नको तर आरक्षण द्या असा आग्रह त्यांनी धरला. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या सदस्यांनी या मुद्याला पाठींबा देत सभागृहात घोषणाबाजी केली, त्यामुळे झालेल्या गोंधळात कामकाज वारंवार तहकुब करावे लागले. अखेर या मुद्यावरच दिवसभराचे कामकाज तहकुब करण्यात आले.

*_टोप्या घालुन केलेले आंदोलन_*

दरम्यान आजच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य डोक्यावर मराठा क्रांती मोर्चाच्या टोप्या घालुन सभागृहात आले होते, कामकाज तहकुब होताच त्यांनी परिसरात मराठा आरक्षण नाकारणाऱ्या सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी व पायऱ्यावर आंदोलन केले. या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष आ.श्री.सुनिल तटकरे, ना.धनंजय मुंडे, आ.सर्वश्री हेमंत टकले, काँग्रेस गटनेते शरद रणपिसे, संजय दत्त, अमरसिंह पंडित, अनिल भोसले, निरंजन डावखरे, नरेंद्र पाटील, ख्वाजा बेग, जयवंतराव जाधव, श्रीमती हुस्नबानु खलिफे, प्रकाश गजभिये, रामराव वडकुते, अब्दुल्लाखान दुर्राणी, आनंद ठाकुर, श्रीमती विद्या चव्हाण आदींनी सहभाग घेतला.

मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्या -ना.धनंजय मुंडेंची विधान परिषदेत
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top