अहमदनगर – माजी मंत्री बबनराव पाचपुतेंच्या गाडीचा भीषण अपघात झाला. मात्र या अपघातात ते थोडक्यात बचावले.
शिरूरजवळ रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. पाचपुतेंच्या गाडीनं भरधाव धावणाऱ्या मालवाहतूक ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.
दरम्यान, या भीषण अपघातात गाडीचा चक्काचूर झाला असून पाचपुते थोडक्यात बचावले. त्यांना कुठलीच इजा झाली नाही.
