नवी दिल्ली- खरीप हंगामात पीकांना उत्पादन खर्चाच्या दिडपट हमीभाव देण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. लवकरच मंत्रीमंडळ बैठकीत याला मंजूरी देण्यात येणार आहे.
नरेंद्र मोदींनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. या भेटीत पीकाच्या उत्पादन खर्चाचा दिडपड हमीभाव देण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
तसंच ऊसाला चांगल्या एफआरपी लवकरच जाहीर करणार असून शेतकऱ्यांच्या भल्याचचं विचार केला जाईल, असंही मोंदीनी सांगितलं.