मुंबई– राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीत पवारांनी मुख्यमंत्र्यांना अनेक सल्ले दिले.
दूध उत्पादकांना मदत मिळावी, दूध भुकटीला निर्यातीसाठी प्रोत्साहन आणि दुग्धजन्य पदार्थांवर लावण्यात आलेली जीएसटी कमी करावी आशा सुचना शरद पवारांनी दिल्या आहेत.
तसंच फळबाग योजना रोजगार हमी योजनेत जोडून घेण्यात यावी अशी मागणीही पवारांनी यावेळी केली. दरम्यान या भेटीत अनेक विषयावर चर्चा झाली.
