बीड– ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना जोरदार धक्का बसलेला असून त्यांच्या जिल्ह्यात जलयुक्तच्या कामात कोट्यावधीचा घोटाळा झाल्याचं समजतंय.
जलयुक्त शिवार योजनेच्या कामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार पुण्यातील कृषी आयुक्ताकडे करण्यात आली होती. त्याची विचारपुस आणि शहानिशा केल्यानंतर हा घोटाळा झाल्याचं समोर आलंय.
दरम्यान, या प्रकरणी परळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. मात्र या गैरव्यवहाराबद्दल बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.