लातूर– महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सगळ्यात जास्त भंपकमंत्री आहेत, त्यांना महत्वाची खाती कशी दिली, अशी जोरदार टीका मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी केली.
भाजप सरकार लोकांना फक्त आश्वासनच देत आलंय, त्यामुळे यांच्यावर विश्वास ठेवायची ही हिम्मत होत नाही, असं ते म्हणाले.
सरकारने मराठा मुलांना शिक्षणात सवलत देऊ अशी घोषणा केली होती, पण त्याची पुर्तता अजूनपपर्यत झाली नाही, त्यामुळे यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.