मुंबई – राज्यातील एस.टी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली होती. नवीन करारानुसार कर्मचाऱ्यांना जून महिन्याच्या पगारापासून वेतनवाढीचा लाभ मिळणार असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं होतं.
मात्र याबाबत कर्मचारी नाराज असून त्याच्यांत संभ्रम आहे. नेमकी पगारवाढ किती झाली आहे? नवीन आणि द्वितीय कर्मचाऱ्यांना किती आहे? अशी सगळी गोंधळाची परिस्थिती आहे.
नव्या वेतनवाढीचा लाभ एक लाख कर्मचाऱ्यांना मिळणार असून मात्र ही वाढ एकतर्फी असल्याचा आरोप एस.टी कामगार संघटनेनं केला आहे.