हैदराबाद– दम असेल तर मोदींनी २०१९ च्या निवडणुकीत मला हैदराबादमध्ये हरवून दाखवावं, असा इशारा एमआयएमचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांनी दिला आहे.
तसंच मी फक्त भाजपलाच चँलेज करत नसून कॉग्रेस आणि भाजप दोघंही युती करून लढले तरीही ते मला हरवू शकत नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, ओवेसींच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आगामी निवडणूका हैदराबादमध्ये कशा रंगतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.