मुंबई– राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे विधानपरिषदेची उमेदवारी बाबाजानी दुर्राणी यांना देण्यात आली आहे. राष्ट्रवादीतर्फे ते बुधवारी उमेदवारीसाठी अर्ज भरणार आहेत.
विधानपरिषदेच्या ११ जांगासाठी मतदान होणार आहे. या निवडणूकीत राष्ट्रवादीकडे एक जागा होती. त्यामुळे परभणीचे जेष्ठ नेते बाबाजानी दुर्राणींना उमेदवारी देण्यात आली होती.
दरम्यान, या निवडणुकीसाठी सगळेच पक्ष तयारीला लागले असून आपआपला उमेदवार देण्यासाठी पक्षांच्या बैठकी सुरू आहेत.