नागपूर– शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यास माझी तयारी आहे. राष्ट्रवादीने तिथं आपला उमेदवार द्यावा, असं राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण म्हणाले. ते नागपूरमध्ये बोलत होते.
खैरे कोण आहेत? २० वर्षात त्यांनी फक्त हिदूत्वांचा फुलोरा फुलवला, कोणत्याच भागात विकासकामे केली नाहीत.अशी जोरदार टीकाही त्यांनी यावेळी केली.
जिल्ह्याचा नेता हा कोणत्या धर्माचा किंवा पक्षाचा नसतो. त्यामुळे खैरेंनी आता धर्माचे राजकारण सोडायला हवे, असा टोलाही त्यांनी लगावला.
