मुंबई– भाजपकडून विधानपरिषदेवर वर्णी लागावी म्हणून मराठवाड्यातून तब्बल ४० जण इच्छुक आहेत.मराठवाड्यातून ४० इच्छुकांची यादी पक्षश्रेष्ठीकडे पाठवण्यात आली आहे.
पुढील महिन्यात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यात भाजपला ५ जागा आहेत. त्यामुळे इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू आहे.
राज्याच्या सत्तेत मराठवाड्याला आतापर्यत नेहमी झुकतं मापच देण्यात आलं आहे. मात्र मराठवाड्यातून पाठवलेल्या ४० जणांच्या यादीवर फुली मारली जाण्याचीच शक्यता वर्तविली जात आहे.