नागपूर– मुंबई सोडून नागपूरला पावसाळी अधिवेशन घेण्याची काय गरज होती? असा प्रश्न विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी उपस्थित केला. ते नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
४ ते २० जुलै दरम्यान नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी बैठक घेऊन भाजपला कोंडीत पकडण्यासाठी मोठी रणनीती आखल्याची शक्यता आहे.
भाजप सरकारनं शेतकऱ्यांसाठी काहीच केलेलं नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच आहेत. त्यामुळे या अधिवेशनात सरकारला प्रश्न विचारणार असल्याचं मुंडेंनी यावेळी सांगितलं.