भोपाळ– मध्यप्रदेशमध्ये भाजप नेत्याची गुंडागर्दी पाहायला मिळाली. भाजप नेत्यानं महिला पोलिसाला मारहाण करत अंगावरील वर्दी फाडल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशमधील टीकमगढ येथे घडली. मुबेंद्र सिंह असं या भाजप नेत्याचं नाव आहे.
संध्याकाळच्या वेळेस ही महिला पोलिस वाहनांची तपासणी करत होती. त्यावेळेस मोटारसायकलवरून आलेल्या भाजप नेत्यानं लहान मुलीला धडक दिली.आणि पळून जाऊ लागला.तेव्हा या महिलेनं त्याला अडवलं. मात्र या भाजप नेत्यानं गुंडागर्दी करत महिलेला मारहाण केली आणि तिच्या अंगावरील वर्दी फाडली.
दरम्यान, या घटनेनंतर या भाजप नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे.
