मुंबई– भाजप सरकारला अर्थशास्र समजत नाही, त्यांना बोकडबुद्धी आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे नेते जिंतेंद्र आव्हाड यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे.
नागपूरवरून प्रथमच आखाती देशात बोकडांची निर्यात होणार होती. मात्र जैन समाजाच्या रिचा जैन यांनी या निर्यातीला विरोध केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निर्यातबंदी थांबवली. त्यामुळे आव्हाडांनी भाजपची चांगलीच खरडपट्टी काढली.
कोणी एका धनिक समाजाच्या दादागिरीमुळे तुम्ही गरीब शेतकऱ्यांच्या पोटावर पाय कसा देऊ शकता, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
https://m.facebook.com/581568278627202/posts/1693030877480931/