मुंबई– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फाजील लाड भोवले, अशा शब्दात शिवसेनेचं मुखपत्र सामनातून उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे.
सिडको जमीन घोटाळा प्रसाद लाडांनी मुख्यमंत्र्यांच्या संगनमताने केला आहे. असा आरोप कॉग्रेसने केला होता. त्यावर उद्धव ठाकरेंनी सामनातून चांगलीच फटकेबाजी केली.
हे सगळे आरोप म्हणजे कॉग्रेसचा पोरकटपणा आहे, असं जरी मुख्यमंत्री म्हणत असले तरी कागदपत्रेच सांगत आहेत. मुख्यमंत्र्यांना फाजील लाड भोवलेत म्हणून, असंही त्यांनी म्हटलंय.
.
