नागपूर– गेली कित्येक वर्ष आम्ही दोघं सोबत आषाढी वारीला जात होतो. आषाढीला जायचा आमचा पायंडाच पडला होता. मात्र यंदा आमचा पांडुरंगच आमच्या सोबत नाही.अशा शब्दांत भाजपचे नेते एकनाथ खडसेंनी आठवणींना उजाळा दिला.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कै.फुंडकर यांच्या शोकप्रस्तावावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
राजकारणात आमचा सतत लंपडाव चालायचा, कधी ते सत्तेत असायचो तर कधी मी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली…