महाराष्ट्र

प्रकरण गंभीर..चौकशी करा : धनंजय मुंडे

मुंबई : ‘नरेंद्र मोदींनी वैयक्तिकरित्या अनिल अंबानींना कंत्राट मिळवून दिले. अनिल अंबानींच्या फायद्यासाठी देशात राफेल विमाने यायला उशीर केला’, असा आरोप राहुल गांधींनी केला असतानाच इकडे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनीही भाजप सरकारला घरचा आहेर दिला आहे. कायदा धाब्यावर बसवून अंबानीसह अन्य श्रीमंतांनी जमिनी हडपल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे.

उद्योगपती अंबानींसह अन्य श्रीमंतांनी हडपलेल्या जमिनी सरकार जमा करण्यासाठी मी तयारी केली होती आणि त्याचवेळी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केल्याने माझ्या वाट्याला वनवास आल्याचा गंभीर आरोप माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. कायदा धाब्यावर बसवून अंबानीसह अन्य श्रीमंतांना नक्की कोण मदत करतंय? खडसेंचा रोख नेमका कोणाकडे आहे? याची कसून चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला ट्विट करत चौकशीची मागणी केली आहे.

Most Popular

To Top