इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी जनरल व राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी गौप्यस्फोट केला. आपल्या राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात सरकारच्या सांगण्यावरूनच जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझर ने भारतात बॉम्बस्फोट केले होते,अशी कबुलीही त्यांनी यावेळी दिली.
पाकिस्तानचे पत्रकार नदी मलिकला टेलिफोन मुलाखतीत त्यांनी ही सर्व माहिती दिली शिवाय, जैश-ए-मोहम्मद वरील कारवाई योग्य असल्याचं त्यांनी समर्थन केलं. तसेच मी नेहमीच या संघटनेला दहशतवादी संघटना संबोधत आलो आहे. त्यांनी माझ्या मृत्यूचा कट रचला होता, मला आनंद आहे की या सरकारने त्यांच्याविरुद्ध कडक वाई केलेली आहे.
मुशर्रफ यांनी स्वतःच्या कार्यकाळात बंदी का आणली नाही , असा प्रश्न विचारला असता मुशर्रफ म्हणाले “त्यावेळी पाकिस्तानची परिस्थिती ठीक नव्हती आणि यामध्ये गुप्तचर यंत्रणेच्या आयएसआय काही अधिकारी सहभागी होते. व भारत पाकिस्तान मध्ये जशास तशी भूमिका घेतली जात होती. ते पाकिस्तानमध्ये पण स्पोट घडत होते”अशी कबुली त्यांनी दिली