नवी दिल्ली – अवघ्या तासाभराच्या अवधीत इराणमध्ये तीन दहशतवादी हल्ले झाले आहेत. अज्ञातांनी इराणच्या संसदेत गोळीबार केल्यानंतर दुसरा हल्ला इराणचे माजी अध्यक्ष अयातुल्ला खोमेनी यांच्या समाधीस्थळावर झाला आहे. तर तिसरा हल्ला मेट्रो स्टेशनजवळ झाल्याचे वृत्तदेखील समोर येत आहे.
तीन ह्ल्लेखोरांनी इराणच्या संसदेत गोळीबार केला आहे. तीन जण या गोळीबारात जखमी झाले आहेत. संसदेवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नसून हा हल्ला नेमक्या कोणत्या हेतूने करण्यात आला आहे, हेदेखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. इराणच्या संसदेत हल्लेखोरांनी गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलांनी संसदेत प्रवेश करत परिस्थिती हाताळण्यास सुरुवात केली आहे.
इराणच्या संसदेत तीन हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. तीन जण या गोळीबारात जखमी झाले आहेत. यामध्ये एका सुरक्षा अधिकाऱ्याचा आणि दोन सामान्य नागरिकांचा समावेश असल्याची माहिती खासदार इलियास हझरती यांनी दिल्याचे एका वृत्तसंस्थेने दिले आहे. काहीजणांना हल्लेखोरांनी ओलीस ठेवले असण्याची भीतीदेखील व्यक्त करण्यात येते आहे. मात्र अद्याप या माहितीला इराणच्या प्रशासनाकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.
