लेनोव्होने त्यांच्या मोटोरोलाच्या मोटो झेड टू प्लेचे यूएसमध्ये लाँचिंग केल्यानंतर दोन दिवसांतच हा फोन भारतातील ग्राहकांसाठी आणत असल्याची घोषणा केली असून या फोनसाठी ग्राहक ८ जूनपासून प्रीबुकींग करू शकणार आहेत. या फोनसाठी खास ऑफर दिली गेली आहे. त्यानुसार सुरवातीला प्रथम २ हजार रूपये भरून फोन बुक करता येईल व नंतर बाकीची रक्कम १० महिन्यांत बिनव्याजी भरता येणार आहे.
मोटो झेड टू प्ले मोटो आर्मर पॅकसह, संरक्षण अॅकसेसरीज सह उपलब्ध होत आहे. नॅनो कोटींगसह असलेला हा फोन वॉटर रिपेलंट असून त्याचा लूकही बदलला गेला आहे. गुळगुळीत मेटल बॉडी, होम बटणच्या खालीच फिंगरप्रिंट सेन्सर स्कॅनर, ५.५ इंची अमोलेड डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ६२६ एसओएस, ३ व ४ जीबी रॅम, मायक्रो एसडीने मेमरी ६४ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, अँड्राईड नगेट ७.१.१ ओएस अशी त्याची अन्य फिचर्स आहेत. फोनला १२ एमपीचे ड्युल ऑटोफोकस कॅमेरा तसेच सेल्फीसाठी ५ एमपीचा कॅमेरा दिला गेला आहे. हा फोन ड्यूल सिम आहे.
