टेक ज्ञान

युट्यूब व्हीडिओंमुळे मालामाल

युट्यूब व्हीडिओंमुळे मालामाल

युट्यूबवर व्हिडीओ चॅनेल सुरु करून लोकप्रिय झालेल्या आणि रग्गड कमाई करणाऱ्या युट्यूब स्टार्सची यादीच ‘फोर्ब्स’ मासिकाने नुकतीच जाहीर केली.

स्मार्टफोनवाल्यांचा आवडता टीपी म्हणजे युट्यूब व्हीडिओ बघणं. पण याच व्हीडिओंनी अनेकांना चक्क करोडपती बनवलं आहे. युट्यूबवर व्हिडीओ चॅनेल सुरु करून लोकप्रिय झालेल्या आणि रग्गड कमाई करणाऱ्या युट्यूब स्टार्सची यादीच ‘फोर्ब्स’ मासिकाने नुकतीच जाहीर केली. कोण आहेत यातले स्टार्स?

फिलिक्स आर्विड युअॅरेफ कॅलबर्ग
फिलिक्स आर्विड युअॅरेफ कॅलबर्ग हा जगातला सर्वाधिक कमाई करणार युट्यूब स्टार आहे. गेम्सवर मजेदार कमेन्ट करून हिट्स मिळणारा कॅलबर्ग पीऊडायपाय (PewDiePie) नावाने लोकप्रिय आहे. हा स्विडीश युट्यूबर वर्षाला युट्यूबवरून १५ दशलक्ष डॉलर्सहून अधिक कमाई करतो. मागील वर्षीही हा या यादीमध्ये अव्वल होता
रोमन अॅटवूड
अमेरिकन कॉमेडीअन असणारा रोमन हा त्याच्या प्रॅक्ससाठी, म्हणजेच आपल्या भाषेत सांगायचं तर एखाद्याला उल्लू बनवण्यासाठी लोकप्रिय आहे. हा वर्षाला युट्यूबवरून ५३ कोटी ९६ लाखांहून अधिक रुपये (८ दशलक्ष डॉलर्स) कमावतो. एका वर्षात याची कमाई ७० टक्क्यांनी वाढली आहे.

लिली सिंग
या यादीतलं भारताशी संबंधीत असणारं एकमेव नाव म्हणजे लिली सिंग. ही युट्यूबवर सुपरवुमन म्हणून लोकप्रिय आहे. लिलीच्या व्हीडिओमध्ये भारतीयांच्या जीवनावर मजेदार टिप्पणी करणारा कंटेंट असतो. लिली वर्षाकाठी युट्यूबवरून ७.५ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ५० कोटीहून रुपये कमावते.

आयन हीकॉक्स आणि

२००३ साली सुरू केलेल्या ‘स्मॉश’ या चॅनेलवरून मजेदार व्हीडिओ ही जोडगोळी शेअर करते. या दोघांनी स्मॉश द मुव्ही या सिनेमातही काम केले असून गोस्टमेट हा त्यांचा नवीन सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. हे दोघे ट्विटवरून ४७ कोटीपेक्षा जास्त (७ दशलक्ष डॉलर्स) पैसा कमावतात.

रोसाना पॅन्सिनो
या अमेरिकन युट्यूबरचे नर्डी नमीज नावाचं स्वयंपाकासंदर्भातलं युट्यूब चॅनेल आहे. ती यामध्ये वेगवेगळे पदार्थ कसे बनवायचे ते करून दाखवते. ती अनेक अमेरिकन टिव्ही शोमध्येही झळकली आहे. रोसानाची वर्षीक युट्यूब कमाई आहे ४० कोटी ४६ लाख रुपयांहून (६ दशलक्ष) अधिक.

टेलर ओकेले

रोमाना बरोबर या कमाईच्या यादीमध्ये ४० कोटी ४६ लाखांहून अधिक कमाई करत टेलरने चौथा क्रमांक विभागून मिळवला आहे. टेलर हा समलैंगिक लोकांच्या हक्कांसाठी झटणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे तो आपल्या चॅनेलवरून समलैंगिकांच्या हक्कांवरील गप्पा, सामाजिक विषय आणि मजेशीर व्हीडिओ शेअर करतो.

Mahasatta.com

युट्यूब व्हीडिओंमुळे मालामाल
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top