डब्बू रत्नानी या प्रसिद्ध छायाचित्रकाराच्या नव्या वर्षाच्या कॅलेंडरसाठी दिशाने टॉपलेस फोटोशूट केले आहे. तिने हा फोटो ट्विटरच्या माध्यमातून शेअर केल्यानंतर तिच्या या अवतारावर टीका होताना दिसत आहे. ट्विटरव्यतिरिक्त दिशा पटानीने इन्स्टाग्रामवर देखील हा फोटो शेअर केला आहे. नशीले डोळे आणि अनोख्या केशरचना या अवतारात दिशाने या फोटोशूटसाठी पोझ दिली आहे. टॉपलेस फोटोबद्दल दिशानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी टॉपलेस नाही, या फोटोमध्ये फक्त माझी पाठ दिसत आहे. माझ्या शरिराविषयी मला आत्मविश्वास असल्यामुळेच मला ही पोझ देताना समस्या आली नाही.’ असे दिशाने म्हटले आहे.
दिशाने स्पष्टिकरण दिले असले तरी, या फोटोवर काहींनी तिखट प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. ‘सेलिब्रिटी समाजाचा आरसा नव्हे तर कचरा असतो, अशी प्रतिक्रिया एका नेटीझन्सने दिली. दिशाच्या या फोटोवर अशा प्रतिक्रिया उमटत असताना दिशाच्या समर्थनार्थ देखील नेटीझन्स समोर येत आहेत. दिशाने काय करावे? किंवा काय करु नये? हे लोकांनी ठरवू नये, अशा प्रकारे देखील नेटीझन्सन व्यक्त होताना दिसते.
यावर्षीच्या कॅलेंडरसाठी डब्बूने २४ सेलिब्रेटींचे फोटोशूट केले आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, यांच्यासह ऐश्वर्या राय बच्चन, प्रियांका चोप्रा, विद्या बालन, आलिया भट्ट, परिणीति चोपड़ा, सोनाक्षी सिन्हा, सनी लिओनी, अनुष्का शर्मा, जॅकलीन फर्नांडीस, श्रद्धा कपूर आणि क्रिती सॅनॉन या अभिनेत्रींचा समावेश आहे. डब्बू रत्नानीने नुकतेच त्याचे सेलिब्रिटी कॅलेण्डर लॉन्च केले. यावेळी विविध बॉलिवूड सेलिब्रिटींनी या कॅलेण्डर लॉन्च सोहळ्याला हजेरी लावत कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढविली. रेखा, शाहरुख खान, सन्नी लिओनी, टायगर श्रॉफ, वरुण धवन, क्रिती सेनॉन आणि बऱ्याच सेलिब्रिटींनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती.
दिशा पटनी आगामी ‘कुंग फू योगा’ या अक्शनपटामध्ये जॅकी चेन आणि सोनू सूद यांच्यासोबत झळकणार आहे.Mahasatta.com
By
Posted on