कंदाहर – अफगाणिस्तानच्या दक्षिण कंदाहरमध्ये गव्हर्नरच्या निवासस्थानी सोफा बॉम्बस्फोट झाला. यात संयुक्त अरब अमिरातीचे ५ अधिकारी आणि इतर १३ जण ठार झाले. कंदाहरचे गव्हर्नर आणि अफगाणिस्तानातील अमिरातचे राजदूत थोडक्यात वाचले. मात्र ते गंभीर जखमी आहेत. हा स्फोट मंगळवारी काबूलच्या संसद भवन परिसरात झालेल्या स्फोटाच्या काही वेळानंतर झाला. काबूल येथे झालेल्या स्फोटात ३८ जण ठार झाले.
कंदाहरचे प्रांतीय पोलिसप्रमुख अब्दुल रजिक यांनी ही माहिती दिली. ते स्फोट झाला तेव्हा तेथेच होते. कंदाहरच्या गव्हर्नरांच्या निवासस्थानातील सोफ्यामध्ये स्फोटके ठेवल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर लोक बसताच धमाका झाला. या आगीत कंदाहरचे गव्हर्नर हुमायून अजिजी आणि अमिरातचे राजदूत अब्दुल्ला अल काबी गंभीर भाजले. संयुक्त अरब अमिरातचे राजदूत आणि अधिकारी मानवी, शैक्षणिक आणि विकास योजनांविषयी चर्चा करण्यासाठी आले होते. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी म्हणाले, हल्ल्यामुळे उभय देशांतील संबंधात दुरावा येणार नाही
Mahasatta.com