By
Posted on
बीजिंग – चीनने लॉउडियन राज्यात हाँगशुई नदीवर ५ किलोमीटर लांबीचा जगातील सर्वात मोठा मार्ग बनवला आहे. २ लाख २२ हजारांहून अधिक फायबरच्या तरंगत्या बीमच्या साह्याने यास तयार करण्यात आले आहे. पाण्यातील बदलानुसार पुलातही बदल होतो. संपूर्ण पर्यटन केंद्र ५० किलोमीटर क्षेत्रफळात विस्तारलेले आहे. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी सामान्य नागरिकांसाठी ते खुले करण्यात आले होते. सुूरुवातीच्या दिवसांत ६० हजार पर्यटकांनी त्यावरून चालण्याचा थरार अनुभवला. हा मार्ग न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन परिसरातील पुलाहून अधिक मोठा आहे.
वॉक-वेदरम्यान मनोरंजन उद्यानही
वॉक-वेदरम्यान किनाऱ्यावर मनोरंजन उद्यानही आहे. येथे पर्यटकांसाठी मनोरंजनाची व्यवस्था आहे. हा संपूर्ण परिसर पायी फिरून काढण्यासाठी एका व्यक्तीला सुमारे १० तास लागतात. Maharastra.com