टेक ज्ञान

व्हॉटस्अॅप कंपनी स्थापण्याची कथाही रंजकच ….

 

व्हॉटस्अॅप कंपनी स्थापण्याची कथाही रंजकच आहे. जॉन कौम व ब्राईन अॅक्टन हे दोघे याहू या कंपनीत नोकरीस होते. पुढे जाऊन त्यांनी सप्टेंबर 2007 मध्ये नोकरी सोडली. त्यानंतर अमेरिकेत भ्रमंती करत असताना प्रवासादरम्यान फेसबुक कंपनीकडे त्यांनी नोकरीसाठी अर्ज केले. परंतु फेसबुकने दोघांचीही निवड केली नाही. पण त्यांनी हार मानली नाही. कौमकडे चार लाख डॉलर्सची बचत होती. त्या बचतीतून वेगळे शोधण्याचा ते प्रयत्न करीत होते. मग त्यांनी आयफोन खरेदी करून त्याने अॅप्लिकेशनवर अभ्यास सुरू केला.

वेस्ट सॅनजोनला राहणारा मित्र अॅलेक्स फिरामॅन यालाही मदतीला घेतले. तेथे दोघांमध्ये फार चर्चा होत असे. चर्चेतून प्रत्येक नावापुढे स्वतःची ओळख असावी, असे त्यांच्या निर्दशनास आले. त्यात संधी शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हे करताना त्यांना जाणवले कि, आपल्याला सॉफ्टवेअर डेव्हलपरची गरज आहे. कारण अॅप्लिकेशनद्वारे भविष्यात मोठी संधी मिळू शकते. त्यांचाच एक मित्र आयगोर सोलोमॅनिको हा रशियन सॉफ्टवेअअर डेव्हलपर होता. त्यांच्या मदतीने संशोधन सुरु ठेवले.

पुढे जाऊन कौम यांनी व्हॉटस्अॅप हे नाव शोधले. ‘काय चालले’ या अर्थाने हे अॅप्लिकेशन शोधले. कोणाचे काय चालले, हे सहज कळावे, यातून हि संकल्पना पुढे आली असावी. व्हॉटस्अॅप कंपनीच्या प्रारंभी अनेक तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे हे सर्व बंद करून पुन्हा नोकरी करावी, असे कौमला काही अंशी वाटले; परंतु त्याचा मित्र ब्राईन अॅक्टन याने त्याला धीर दिला. पुढे अॅक्टनेही काही रक्कम गुंतविली. सोबतच ‘याहू’तील जुन्या 5 मित्रांनी 2.5 लाख डॉलर गुंतविले. त्यांनाही कंपनीचे भागीदार करुन घेतले. 2009 मध्ये आयफोनवर तर जानेवारी 2010 मध्ये ब्लॅकबेरीवर हे अॅप्लिकेशनन सुरु केले. प्रारंभी फक्त मजकुर (टेक्स्ट) पाठविता येत होता. नंतर त्यात संधोधन होऊन फोटोही पाठविला जात असे.

2011 च्या प्रारंभी व्हॉटस्अॅपचे अमेरिकेतील अॅप स्टोअरच्या पहिल्या 20 क्रमांकामध्ये आले आणि जगाच्या नजरा व्हॉटस्अॅपकडे वळाल्या. व्हॉटस्अॅपची वाढती क्रेझ पाहता 19 फेब्रुवारी 2014 रोजी फेसबुकने हि कंपनी 19.3 बिलियन डॉलर्सला विकत घेतली.

_*For Breaking News on WhatsApp Join LetsUp. To Join Click*_ ? https://goo.gl/SFtYq8

?

व्हॉटस्अॅप कंपनी स्थापण्याची कथाही रंजकच ….
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top