By
Posted on
महासत्ता , बीड
बीड जिल्ह्यातील एका आश्रमशाळेत शिक्षकानेच विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झाले.
या प्रकरणी शिक्षक देवराव नाथा मस्के याच्यावर काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
या नराधम शिक्षकाने पाच मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. शिरूर तालुक्यातील सिंदफना आश्रमशाळेत ही लाजीरवाणी घटना घडली आहे.
लेक लाडकी अभियाना अंतर्गत सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी या आश्रमशाळेला भेट दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, या प्रकरणी आरोपीला पळून जाण्याची संधी दिली. असा आरोप वर्षा देशपांडे यांनी केला.
Mahasatta.com