नागपूर – हमीभावात वाढ केली आहे म्हणत भाजप सरकारनं शेतकऱ्यांना पुन्हा एकदा गाजर दाखवलं आहे, अशी जोरदार टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
चार वर्षापुर्वी अच्छे दिनचे स्वप्न दाखवले होते, आणि आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार सर्वसामान्यांना स्नप्न दाखवत आहे. असं ते म्हणाले.
दरम्यान, भाजपनं शेतकऱ्यांला देशोधडीला लावलं आहे. भाजपमुळेच शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे,असा आरोपही त्यांनी यावेळी केला.