मुख्य बातम्या

भिडे जातीय दंगली घडवणारा व्हायरस आहे; चित्रा वाघ यांचा आरोप

जालना – संभाजी भिडे जातीय दंगली घडवणारा व्हायरस आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. त्या जालन्यात बोलत होत्या.

भिडेंनी नुकतंच मनू हा ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांपेक्षा एक पाऊल पुढं होता, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांनी जोरदार टीका करत भिडेंवर निशाणा साधला.

महाराष्ट्रातील महिलांवर घडणाऱ्या अत्याचाराविरोधात राष्ट्रवादीच्यावतीने हिंसाचार मुक्त महाराष्ट्र उपक्रम राबवण्यात येत आहे. त्या निमित्ताने त्या राज्यभर फिरत आहेत. दरम्यान संभाजी भिडे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतरही मोकाट फिरत आहे. त्याला अटक करा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

Most Popular

To Top