शिरूर – शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव यांची २०१९ ची लोकसभा उमेदवारी पक्की झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी याबाबत ग्रिन सिग्नल दिला आहे.
उद्धव ठाकरे आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात पुण्यात आले होते. तेव्हा त्यांनी आढळरावांना उमेदवारी देत विधानसभेच्या ४ जागाही निवडून आणा असं सांगत त्यांना उमेदवारी दिली.
तसंच बंद बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्यासाठी येत्या काही दिवसांतच मुख्यमंत्री व सबंधित केंद्रीय मंत्री यांच्याशी चर्चा करू, असंही ठाकरे यावेळी म्हणाले.
