नागपूर – आम्हांला संविधान हवंय, अंधाराने भरलेली मनुस्मृती नको, असं म्हणत राष्ट्रवादीेचे नेते अजित पवारांनी मनुस्मृतीवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी तर्फे संविधान बचाव आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.
मनुस्मृतीनं ९७ टक्के लोकांना शुद्र घोषीत केलं. महिलांना हिन अशी वागणूक दिली. त्याच मनुस्मृतीचा कार्यक्रम राबवण्याचं काम काही जणांकडून चाललं आहे.
काही दिवसांअगोदर संभाजी भिडेंनी मनुस्मृतीबद्दल वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावरही त्यांनी जोरदार टीका केली. त्यामुळे मनुस्मृती गाडली जायला हवी. नाहीतर पूर्वीचे दिवस येतील असंही ते म्हणाले.