मुंबई– हार्दिक पटेलने दूध आंदोलनाकडे पाठ फिरवल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना स्वत: खुर्ची टाकून गुजरातहून येणारे ट्रक आडवावे लागत आहेत.
दूधाला ५ रूपये दरवाढ करून मिळावी आणि रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी यासाठी शेट्टींनी राज्यभर आंदोलन सुरू केलं आहे.
या आंदोलनाला पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल पाठिंबा देणार होता. तसं त्याने जाहीरही केलं होतं. मात्र या आंदोलनाकडे त्यानं सपशेल पाठ फिरवल्याचं दिसतंय. त्यामुळे राजू शेट्टींना गुजरातहून येणारे ट्रक अडवण्यासाठी खुर्ची टाकून रस्त्यावर बसण्याची वेळ आलीय.
