नागपूर– मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका, मराठा आरक्षणाबाबतीत तातडीने निर्णय घ्या, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले. ते नागपुरातील पावसाळी अधिवेशनात बोलत होते.
मराठा समाजाने राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढले. लाखो लोक रस्त्यावर उतरले. आतापर्यत ५७ मोर्चे झालेत. तालुक्या-तालुक्यांतून आता मोर्चे निघायला लागले आहेत. त्यामुळे सरकारने तातडीनं पाऊल उचलावं.
दरम्यान, मुंडेंनी विधानपरिषदेत हा मुद्दा उचलून धरला असून सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अधिवेशनात मागणी केली आहे.
