बीड– मराठा आरक्षणाची मागणी दिंवसेंदिवस तिव्र होत चालली आहे. आरक्षणासाठी बीडमध्ये आणखी एका मराठा तरूणाने आत्महत्या केली आहे. अभिजित देशमुख असं या आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव आहे.
आत्महत्येपूर्वी अभिजीतने एक चिठ्ठी लिहली आहे. त्यात माझ्या औषध गोळ्याचा खर्च, बँकेचे कर्ज, आणि मराठा आरक्षण यामुळे मी जात आहे, असं चिठ्ठीत लिहलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आतापर्यत ५ जणांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे मराठा समाजातून तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. आणि आरक्षणाची मागणी अधिकच जोर धरू लागली आहे.