मुंबई – मराठा आरक्षणावर बोलायचं नाही म्हणून शिवसेनेच्या एकनाथ शिंदेच्या बंगल्यावरून मला फोन आला होता, असा गौप्यस्फोट मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा देणारे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.
काल औरंगाबादमध्ये आणखी एका मराठा तरूणाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचे मला समजले आणि मी आधी मुख्यमंत्री व नंतर राज्यपाल महोदयांच्या कार्यालयात फोन करून अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. त्यावर काहीच निर्णय होत नाही म्हटल्यावर मी मंत्रालयाजवळ असलेल्या महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ ठिय्या दिला होता. त्यामुळे पोलिसांनी मला अटक केली.
माझ्यासाठी हे धक्कादायक असून पक्ष आणि मंत्र्यांचे हेच धोरण असेल तर मी याचा निषेध करतो. आज स्व. आनंद दिघे असते तर त्यांनी एकनाथ शिंदे यांना ठिकाणावर आणले असते असा टोला देखील जाधव यांनी लगावला.
